Breaking News

कुलभूषण जाधवांची फाशीची शिक्षा रद्द करा, आईची पाककडे याचिका

नवी दिल्ली, दि. 27 - पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करावी यासाठी त्यांच्या आईनं धाव घेतली आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण यांच्या सुटकेसाठी त्यांच्या आई अवंती जाधव यांनी केलेली याचिका भारतानं पाकिस्तानकडे सोपवली आहे. कुलभूषण यांना भेटण्याचीही विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. आता पाकिस्तान संबंधित याचिकेवर कोणती भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान भारताचे पाकिस्तानातले उच्चायुक्त गौतम बंबावले यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची भेट घेऊन कुलभूषण जाधवांना भेटू देण्याची विनंती केली. मात्र पाकनं ती मागणी फेटाळली आहे. पाकिस्तानात हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिथल्या लष्कराच्या न्यायालयानं कुलभूषण जाधवांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारतानं पाकिस्तानकडे केलेल्या चार मागण्या जाहीर केल्या आहेत.