Breaking News

गणेश भांड उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

राहुरी तालुका प्रतिनिधी 

अहमदनगरच्या सह्याद्री उद्योग समुहाच्यावतीने देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराने देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांना सन्मानित करण्यात आले.

उद्योग, बँकिंग, शिक्षण, कला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना अहमदनगर येथील सह्याद्री उद्योग समुहाच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष भांड यांना राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन विकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमास शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आ. विनायक मेटे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, साहित्यीक संजय कळमकर, सह्याद्रीचे अध्यक्ष संदीप थोरात, तुषार दरेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले. गणेश भांड यांनी शून्यातून विश्व निर्माण करून चैतन्य उद्योग समूह उभा करुन अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान असल्यामुळे या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला.

राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, आ. भाऊसाहेब कांबळे, पद्मश्री विखे साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी या पुरस्काराबद्दल भांड यांचे अभिनंदन केले.