Breaking News

अमृतवाहिनी’तर्फे स्वयंचलित बटन प्रकल्प भेट


संगमनेर प्रतिनिधी

येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ई. अँण्ड टी. सी.विभागाच्यावतीने आय. ई. ई. ई. सामाजिक उपक्रमांतर्गत संग्राम मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘इलेक्ट्रीकल वस्तुंसाठी स्वयंचलित बटन’ प्रकल्प भेट देण्यात आला़. अमृतवाहिनीच्या आय. ई. ई. ई. सामाजिक उपक्रम विभागातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शाळेला भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक वाय. डी. देशमुख आणि अधिक्षक सुरेश म्हाळस, डॉ़. आर. पी. लबडे आदी उपस्थित होते. ‘अमृतवाहिनी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़. एम़. ए़. व्यंकटेश यांनी उपक्रमाचे कौतुक केले़.