Breaking News

पोलिसांनी गोवंशी जनावरे पकडली


।संगमनेर / प्रतिनिधी।
शहर पोलिसांनी आज {दि. १५} दुपारी कोल्हार घोटी महामार्गावरील कासार दुमाला गावच्या शिवारात अवैधरित्या सात गोवंश जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करत असलेल्या दोन आरोपींसह जनावरांना ताब्यात घेतले. पो. नि. पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील कोल्हार घोटी महामार्गावरून कसारवाडी शिवाराजवळ काही अज्ञात आरोपींकडून टाटा एस (क्र. एम एच १२ जीटी २३६१) वाहनातून गोवंशी जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पो. कॉ. तळेकर व इतर पोलीस कर्मचारी सदस्य घटनास्थळी पोहोचले. दोन आरोपी नावे तनवीर मुन्ना पठाण (रा. कुरण रोड संगमनेर) व शहाबाज मुख्तार बेग (रा. मोगलपूर संगमनेर) यांना ६० हजार रुपये किंमतीची सात गोवंशी जनावरे कत्तलीच्या उद्देशाने नेत असताना आढळून आले. त्यानुसार शहर पोलिसांनी जनावरे ताब्यात घेऊन दोन्हीही आरोपींविरोधात गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पो. नि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. देशमुख करीत आहे.