Breaking News

विकासात स्व. देशमुखांचे मोलाचे योगदान : आ. थोरात


संगमनेर प्रतिनिधी - सर्वच क्षेत्रातील दिग्गजांशी जिव्हाळ्यााचे नाते निर्माण करुन स्व. विलासराव देशमुखांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून राज्यातच नव्हे तर देशात वेगळा ठसा उमटविला. शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांना सतत मदतीसाठी धोरणात्मक व तात्काळ अनेक ठोस निर्णय घेणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान आहे, असे प्रतिपान माजी महसूलमंत्री, काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.

‘यशोधन’ या त्यांच्या संपर्क कार्यालयात संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्व. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, शहराध्यक्ष विश्‍वासराव मूर्तडक, शिवाजीराव थोरात, उपसभापती नवनाथ अरगडे, चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर, प्रा. बाबा खरात, गणेश मादास, नितीन अभंग, सुभाष सांगळे, गणेश गुंजाळ, अ‍ॅड. सुहास आहेर, रामनाथ अभंग, बुवाजी बाबा पुणेकर, डॉ. नामदेव गुंजाळ, सिताराम वर्पे, शिवाजी गोसावी, बंटी साळवे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. यावेळी तालुक्यातील व शहरातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते. शहराध्यक्ष विश्‍वास मुर्तडक यांनी आभार मानले.