Breaking News

निकालाचे विरोधकांकडून स्वागत

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर दिल्लीचे तख्त काबीज करण्यात केजरीवाल सरकारला यश मिळाले आहे. प्रत्येक प्रकरणाच्या निर्णयप्रक्रियेत उपराज्यपालांच्या परवानगीची गरज नाही, असे ठाम मत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी व्यक्त केले. त्यानंतर याप्रकरणी राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सरन्यायाधीशांचे आभार व्यक्त करत हा लोकशाहीचा मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अतिशय महत्त्वाचा आहे. आता दिल्ली सरकारला त्यांच्या फाईल उपराज्यपालांकडे परवानगीसाठी पाठविण्याची गरज नाही. आता कुठलेही काम थांबवून ठेवले जाणार नाही. या निकालाबद्दल मी सरन्यायाधीशांचे आभार व्यक्त करतो. हा लोकशाहीचा मोठा विजय आहे, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे.