संत श्री निवृत्ती महाराज दिंडीचे कर्जत शहरात स्वागत
कर्जत / प्रतिनिधी
संत श्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज दिंडी सोहळा कर्जत शहरात भक्ति-भावाने दाखल झाला, ग्रामस्थाच्यावतीने फटाक्याच्या आतिषबाजीत या दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी कर्जतचे भजनी मंडळासह विविध शाळाही सहभागी झाल्या होत्या, आज पालखी रथाचा मुक्काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आहे.
शनिवारी कर्जत शहरात श्री संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज दिंडीचे दादा पाटील महाविद्यालय जवळ मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष संजय महाराज धोंडगे, दिंडीचे मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, पुजारी जयंत महाराज गोसावी, मार्गदर्शक रामकृष्ण महाराज लहवीतकर, विनीत सबनीस, सुनील कटारिया, चेतन नागरे महाराज, पंडित महाराज कोल्हे, बाळकृष्ण डावरे, आदिंचे कर्जतकरांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार किरण सावंत, पोलिस उपनिरीक्षक शाहदेव पालवे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी पालखी रथास पुष्पहार अर्पण केला. यासह नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रवीण घुले, दत्तात्रय शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनी ही पालखीतील वारकरी आणि दिंडी प्रमुख यांचे स्वागत केले. समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रखुमाई, संतश्री गोदड महाराज, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांचे सह भालदार चोपदार यांची वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी केले होते. अनेकांनी त्याचे दर्शन घेत त्यांचे फोटो काढण्याची हौस पूर्ण केली.
कर्जत येथील, श्री गोदड महाराज तरुण मंडळाच्यावतीने पिठलं भाकरीचे भोजन देण्यात आले, अभय सुमतीलाल बोरा यांनी सांबर भात लापशीचे भोजनाची पंगत घातली, भीमा जंगम यांचे वतीने मोफत चहा वाटप करण्यात आले, तर मुंजोबा प्रतिष्ठानच्या वतीने चहा बिस्किटे वाटप करण्यात आली यामध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, रवींद्र सुपेकर, राजू धोत्रे, नामदेव थोरात आदी सह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली
मुस्लिम समाजाच्या वतीनेही समशेर शेखसह मुस्लिम बांधवांनी दिंडीचे स्वागत केले तर, विविध सामाजिक संघटनेच्या वतीने सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले,