Breaking News

भेंडा येथील मुस्लिम स्मशानभूमी संरक्षक भिंतीचे कामाची शुभारंभ


भेंडा - प्रतिनिधी
भेंडा बुद्रुक येथील लांडेवाडीतील मुस्लिम स्मशानभूमी संरक्षक भिंत व सिमेंट रस्त्याचे कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई मुरकुटे यांच्या हस्ते झाला. भेंडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे यांचे निधीतून लांडेवाडी मुस्लिम स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत व सिमेंट रस्ता या 9 लाख रुपये खर्चाच्या कामांचा
शुभारंभ मुरकुटे यांचे हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, माजी सरपंच अशोक मिसाळ, बाजार समितीचे संचालक डॉ.शिवाजी शिंदे, संतोष मिसाळ, राष्ट्रवादीचे सरचिटणीस गणेश गव्हाणे, माजी सरपंच गुलाबराव आढागळे, माजी उपसरपंच अशोक वायकर, अंबादास गोंडे, उपसरपंच संतोष मिसाळ, माजी उपसरपंच भाऊसाहेब फुलारी, शिवाजी फुलारी,आबासाहेब काळे,ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काळे,दादासाहेब गजरे,रामचंद्र गंगावणे,बापूसाहेब नवले,अण्णासाहेब गव्हाणे,डॉ.विजय मुळे, रोहिदास आढागळे, दिलदार शेख,अफजल पटेल,उदयोजक अमिन सय्यद, बनाभाई शेख, वजिर शेख, गफुर शेख, इन्नुस शेख, अहेमद शेख, यासीन शेख, समीर शेख, महेबुब शेख, लालाभाई शेख, फिरोज शेख, ग्रामविकास अधिकारी रेवन्ननाथ भिसे, बाबासाहेब गोर्डे, विष्णू फुलारी, रामभाऊ देशमुख आदी उपस्थित होते.