दलाल, आडतदार हे आमचे मालक नाहीत ः राजू शेट्टी
पुणे, दि. 14 - शेतकर्यांच्या मालाची बांधावर खरेदी झाली, तर शेतकर्यांचा फायदा आहे. मध्यस्थांचे प्रमाण वाढल्याने शेतकरी, ग्राहकांचे नुकसान होत आहे. दलाल, आडतदार हे आमचे मालक नाहीत, अशी प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारच्या नियमनमुक्ती धोरणाला विरोध करून बाजार समितीतील नियमन हटवावे, यासाठी राज्यभरातील व्यापारी संपावर गेले आहेत. विनियमनमुक्तीला विरोध करण्यासाठी बेमुदत संपावर गेलेल्या व्यापार्यांविरोधात राज्य पणन विभागाने जय्यत तयारी केली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी आणि थेट पणन परवानाधारकांमार्फत शहरांमध्ये थेट विक्रीसाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार आज सकाळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांनी थेट माल विक्रीस आणला होता. यावेळी राजू शेट्टी उपस्थित होते.