Breaking News

कला शाखेचा निकाल जाहीर; प्रगती चोखर अव्वल


राहाता / प्रतिनिधी
शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूट संचलित राहाता येथिल कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा व्दितीय वर्ष कला शाखेचा निकाल जाहीर झाला असून, प्रगती दिलीप चोखर यांनी व्दितीय वर्ष कला शाखेत प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. मार्च-एप्रिल 2018 मध्ये घेण्यात आलेल्या व्दितीय वर्ष कला शाखेचा निकाल 90 टक्के लागला असून, प्रगती दिलीप चोखर यांनी 78.33 टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर, निलेश सुरेश लोखंडे 71.33 टक्के गुण मिळवून व्दितीय तर, कावेरी फुलसिंग कुचे यांनी 68.33 टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक मिळविला. तृतीय वर्ष कला शाखेचा निकाल 89. टक्के लागला असून, विनायक रावजी कोते 79 टक्के गुण मिळवत प्रथम, दिपाली शिवाजी डोखे 69.66 टक्के गुण मिळवून द्वितीय तर, निशा संजय गिरमे 68.33 टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांकाचे यश मिळविले. या यशाबद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील, जि प अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, रनरागीनी महीला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील, प्राचार्य डॉ. बी के सलालकर, उपप्रचार्य प्रा. संजय लहारे यांसह प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.