Breaking News

नदीत नाव उलटून 15 जण बुडाले

चंद्रपूर, दि. 12 -  देसाइगंज तालुक्यातील सावंगी गावातील वैनगंगा घाटावर नाव उलटून 15 जण पाण्यात बुडाले. आत्तापर्यंत 5 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 
देसाइगंज तालुक्यात भाजीपाला विकण्या करीता येणार्‍या ब्रह्मपुरी तालुक्यातील जूनी लाडज येथिल नेहमीच नावेने येतात. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान नावेवर 10ते 15 भाजी विक्रेते विद्यार्थी व 1 दुचाकी वाहन  घेऊन नाव येत होती. नाव तिरा पासून 15  फुटावर येताच नावेचा तोल गेल्याने नाव उलटली 2 पुरुष व 1 मुलगा पोहुन बाहेर निघाला. प्रशासनाने  शोध मोहीम आरंभ होताच  1 स्त्री व एका मुलाला वाचविण्यात  आले.