Breaking News

मा.ना.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मंत्रीपदाचा पालम मध्ये जल्लोष

पालम/प्रतिनिधी, दि. 09 - राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारात मराठवाड्याच्या वाट्याला दोन मंत्रीपदे आली असुन त्यात लातुर जिल्ह्यातील निलंग्याचे आ. मा.ना.संभाजी पाटील निलेंगेकर यांची कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य पदी निवड झाली. त्यांच्या निवडीची बातमी ऐकतात  पालम  शहरातील नागरीकांना फटाक्यांची आतषबाजी करुन  आनंद साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेशराव रोकडे (दादा), पालम नगर पंचायतचे  प्रथम नगरअध्यक्ष बालासाहेब रोकडे लक्ष्मणराव रोकडे नगर सेवक गजानन रोकडे अ.मो. जिल्हाउपाध्यक्ष डॉ. शेख बडेसाब ता.अध्यक्ष भागवत बाजगिर नगर सेवक शेख अकबर नगर सेवक संजय थिटे लिंबाजीराव टोले, यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.