सातारा नगरपालिकेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा शिवसैनिकांचा निर्धार
सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) - येथील नगरपालिकेत ताकदीनिशी पक्ष चिन्हावरच लढायचे आहे. त्यासाठी बेरजेचे राजकारण करण्यास सुरवात करा. निवडणुकीचे वातावरण तयार करण्यासाठी लागेल ती पक्षाची ताकद वापरुया. उद्योगमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडून सातार्यातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करुया असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केले. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने येथील शिवसेना पक्ष कार्यालयात कदम यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यास जिल्हाउपप्रमुख चंद्रकांत जाधव, शहर शाखाप्रमुख किशोर पंडित, तालुका प्रमुख हरिदास जगदाळे आदी उपस्थित होते.
कदम म्हणाले, भाजपबरोबर लढायचे की नाही हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय आहे. आपण सारे आदेशाचे धनी आहोत. त्यामुळे सध्या तरी स्वबळावर निवडणूक लढण्याचे आदेश असल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढायची आहे. आपण कुठे कमी आहोत तेथे भक्कम होण्यासाठी त्रुटी दूर करा. कोण नाराज आहे, त्यांची मनधरणी करा, कोणाला निवडणुकीला उभे करायचे, कोणाला पक्षात प्रवेश द्यायचा, याचे आखाडे बाधा. शहरात 11 प्रभागांत खुले आरक्षण आहे, त्याचाही विचार करुन जोरदार तयारी करा. त्यासाठी संघटनेच्या कामाचा अनुभव वापरा. जुन्या पदाधिकार्यांना बरोबर घ्या.
सातार्यातील करंजे औद्योगिक वसाहत, सार्वजनिक आरोग्य व प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्र्यांची सातार्यात भेट घडवून आणण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यावर कदम यांनी पक्षातील वरिष्ठांकडून काय अपेक्षा आहेत, याची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या.