Breaking News

यांत्रिकी भात शेती लागवड पद्धतीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

चांदा ते बांदा योजनेअतर्गत आधुनिक यांत्रिकी भात शेती लागवड पद्धतीचा शुभारंभ शनिवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडी तालुक्यात तळवडे इथ करण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे जिल्यातलं १ हजार एकर क्षेत्र भात शेती लागवडीखाली येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात हरितक्रांती होईल असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे स्वतः हे यंत्र चालवून त्याची चाचणीसुद्धा घेतली. सावंतवाडी तालुक्यात तळवडे इथ यांत्रिकी शेती पध्दतीचा शुभारंभ शनिवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. तळवडे येथील शेतकरी रवींद्र काजरेकर आणि आनंद बुगडे यांच्या शेतजमिनीत हा शुभारंभ झाला. विशेष म्हणजे स्वतः पालकमंत्री केसरकर यांनी हे भात शेती यंत्र चालवले. जिल्ह्यातल्या शेतीचा विकास करायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे असे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले