Breaking News

सिंधुदुर्ग येथे शेतीकामाला वेग

कोकण म्हणजे शेती आणि शेती म्हणजे कोकण असे म्हटले जाते. पावसाळा सुरु झाला की कोकणात शेतीच्या कामाला सुरुवात होते. पाऊस सुरु झाल्याने शेतीच्या कामाला आता वेग आला आहे. कोकणात आता पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सिंधुदुर्गात शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांना अपेक्षित आणि आवश्यक असलेला पाऊस सुरु झाल्याने इथला शेतकरी सुखावला आहे.जूनच्या सुरुवातीलाच भात पिकांची पेरणी केली झाली आहे. त्यामुळे शेतीला पूरक पाउस झाल्याने भाताचा तरवा उत्तम तयार झाला आहे. तरवा काढून जमिनीची नांगरणी करुन चिखल करुन तरव्याची लावणी करण्याच्या कामाला आता वेग आला आहे. अगदी नजीकच्या काळापर्यंत बैलाच्या साहाय्याने जोत धरून नांगरून शेती केली जायची. परंतू आजच्या आधूनिक काळात ट्रँक्टरच्या साह्याने यांत्रिक शेती करण बळीराजा पसंत करत आहे. एकंदरीतच पुरेसा पाउस झाल्याने शेतकरी राजा सुखावल आहे.