अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मथुरा : यमुना द्रुतगती महामार्गावर अपघाताची घटना घडली आहे. रायाठाना जवळ एक भरधाव कार महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमध्ये घुसली. या कारचा वेग इतका जास्त होता की, कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील सर्व मृतक हे एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. कानपूरमधील एका कुटुंबातील चार जण कारने आग्र्याहून नोयडाच्या दिशेने जात होते. रायाठाना परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये ही कार घुसली. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की कारचा जागीच चुराडा झाला व कारमधील दोन महिलांसह एकूण चार प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला. आजुबाजूच्या लोकांनी स्थानिक पोलिसांनी अपघाताची माहिती कळवताच पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. व अपघातातील मृतदेह तत्काळ शव विच्छेदनासाठी पाठवून दिले.