Breaking News

विनातिकिट प्रवास करणा-या प्रवाशांकडून 12 कोटींची दंड वसुली

मुंबई, दि. 23, नोव्हेंबर - ऑक्टोबर महिन्यात विनातिकिट प्रवास करणा-यांविरोधात पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईत 2 लाख 64 हजार प्रकरणांत 12 कोटी 35 लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम 12.04 टक्क्यांनी अधिक आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 


या बरोबरच 825 भिकारी व अनधिकृत फेरीवाल्यांकडून दंड वसुली करून त्यांना रेल्वे परिसरातून बाहेर काढण्यात आले. तर 153 जणांना तुरुंगात पाठवण्यात आले. दलाल व असामाजिक घटकांविरोधात पश्‍चिम रेल्वेकडून 232 ठिकाणी तपासणी करण्यात आली. परिणामी 151 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर रेल्वे कायद्यातील विविध कलमांखाली खटले चालवण्यात आले व त्यानुसार दंड वसुली करण्यात आली, असेही श्री. भाकर यांनी सांगितले.