परतीच्या प्रवाशांसाठी पुण्याला एसटीकडून 100 गाड्या जादा
सोलापूर, दि. 25, ऑगस्ट - तीन दिवसांच्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन परतणार्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले. सोलापूरहून पुण्याला परतणार्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने रविवारी सोलापूरहून पुण्यासाठी 10 ते 20 गाड्या जादा सोडण्यात येणार आहे. तर संपूर्ण विभागातून 100 गाड्या पुण्यासाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अश्वजित जानराव यांनी दिली. शुक्रवार, शनिवार दोन दिवस थांबून पुन्हा पुण्याचा परतीचा प्रवास करणार्यांची ही संख्या अधिक आहे. सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, आदी ठिकाणांहून पुण्यासाठी गाड्या सोडल्या जातील.