यूपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना र्ीिील.र्सेीं.ळप आणि र्ीिीलेपश्रळपश.पळल.ळप या संकेतस्थळावरती निकाल पाहता येईल. देशभरातील तीन लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा 1 ऑक्टोबरला होणार आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी पहिल्या पेपरवरूनच कट ऑफ लिस्ट तयार होते. दुसर्या पेपरमध्ये केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवेसाठी पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यात परीक्षा घेतली जाते.