Breaking News

हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी:भारत उपविजेता


नवी दिल्ली वृत्तसंस्था

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा शूट आऊटमध्ये पराभव झाला. भारताचा ३-१ ने पराभव करत ऑस्ट्रेलियाने १५व्या वेळेस चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. तर भारत सलग दुसऱ्यांदा उपविजेता ठरला. सामन्यात दोन्ही संघांनी १-१ गोल केला होता. यामुळे पॅनल्टी शूट आऊटचा निर्णय घेण्यात आला. २०१६मध्ये लंडन येथे झालेल्या स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारतावर पेनल्टी शूटआउटमध्ये मात केली होती. ऑस्ट्रेलियाने विक्रमी पंधराव्यांदा ही स्पर्धा जिंकली. भारताला मात्र दुसऱ्यांदा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया संघ अव्वल, तर भारतीय संघ सहाव्या स्थानावर आहे. निर्धारित वेळेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १-१ असे बरोबरीत रोखले होते. भारताकडून सरदारसिंग, हरमनप्रीत आणि 
ललितचे गोल ऑस्ट्रेलियाचा गोलरक्षक टेलर लोव्हेलने अडविले. मनप्रीतसिंग एकमेव गोल केला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी

याआधी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पेनल्टी शूटआऊटवर पराभव स्विकारावा लागला होता. नेदरलँडमध्येही तीच पुनरावृत्ती झाली. ऑस्ट्रेलियाने आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलच श्रीजेशचा बचाव भेदून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र भारताकडून सरदार सिंह, मनदीप सिंह आणि ललित उपाध्याय या खेळाडूंनी पहिल्या ३ संधींमध्ये गोल करता आला नाही. भारताकडून मनप्रीत सिंहने एकमेव गोल झळकावला, मात्र तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने आपल्या ३-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं.