रशियाची स्पेनवर ४-३ ने मात
अर्जेंटिना, जर्मनी आणि पोर्तुगालनंतर २०१०चा फिफा वर्ल्डकप विजेता संघ स्पेन हा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अतिशय रोमांचक झालेल्या सामन्यात पॅनल्टी शूट आऊटमध्ये रशियाने ४-३ने स्पेनचा पराभव करत धक्का दिला. सामन्यातील या विजयामुळे रशियाने उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी गोल करुन १-१ ने बरोबरी राखली होती. या सामन्यांत रशियाचा खेळाडू आयगर अकिनफिव्ह ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला. पहिल्या हाफच्यासुरुवातीला रशियाच्या १२ मिनिटाला केलेल्या आत्मघाती गोलमुळे स्पेनला १-० अशी आघाडी मिळाली होती. तर दुसऱा हाफ संपण्याच्या काही वेळपूर्वी ४१व्या मिनिटालारशियाकडून ड्युबाने शानदार गोल करुन स्कोर १-१ असा बरोबरीत राखला. तर दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही. दोन्ही संघांनी दुसऱ्या हाफमध्ये गोलचीआघाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही अपयशी ठरले. यानंतर या सामन्यासाठी ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. मात्र, यातही सामन्याचा निकाल लागू शकलानाही. त्यानंतर दोन्ही सामन्यांदरम्यान पेनल्टी शूटआऊट खेळवला गेला. यामध्ये रशियाने २०१०मधील विश्वविजेता संघ स्पेनला ४-३ ने हारवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशकेला.आजवर विश्वचषक स्पर्धेत पेनल्टी शूटआऊटमध्ये यजमान संघ कधीही हारलेला नाही. तीच परंपरा या सामन्यांत रशियानेही कायम राखली.