Breaking News

दारुड्या बापाच्या जांचाला कटांळून १३ वर्षीय मुलीची आत्महत्या

राजवड ता.पारोळा येथे दारूच्या नशेत नेहमी शिवीगाळ व मारहाण करून त्रास देणा-या बापाच्या जांचाला कंटाळून छकुली देवरे या १३ वर्षीय मुलीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. छकुलीला घरातील वारंवार शिवीगाळ व मारहाण करून तिला सुरेश हे त्रास देत होते. त्या छळाला कंटाळून छकुलीनेराहाते घरात काहीतरी विषारी पदार्थ सेवन केले. शेजा-यांना सदर मुलगी पडलेली दिसल्याने तिला पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा झाला. याबाबत छकुलीचे मामा सुनील रामा पटाईत रा. कृष्णापुरी बहिरम नगर पाचोरा यांनी पारोळा पो. स्टे. ला फिर्याद दिल्यावरून मुलीचे वडील सुरेश देवरे विरुद्ध मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.