शेवगाव येथे 500 झाडांचे वृक्षारोपण
वरुर/ प्रतिनिधी - शेवगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन ऊर्जा फाऊंडेशन शेवगाव , रोटरी क्लब आँफ शेवगाव सिटी व रेसिडेन्सिल हायस्कूल यांच्या संयूक्त विद्यमाने करण्यात आले होते. शेवगावमध्ये वरुर रोड शेवगाव येथे तब्बल 500 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. मागील वर्षापासून ऊर्जा फाऊंडेशन शेवगाव ही सामाजिक संस्था झाडे लावूया, झाडे जगवूया निसर्ग वाचवूया शेतकरी जगवूया अशा स्वरूपाचे कार्य करत असून वृक्ष लावण्याचे काम करत आहेत. ही संस्था नुसते झाडे लावत नाही तर त्या झाडांचे संगोपनही करते. चालू वर्षी रोटरी क्लब आँफ शेवगाव सिटी व रेसिडेन्सिल हायस्कूल शेवगाव यांच्या समवेत 1500 झाडे जगवण्याचा संकल्प करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमात संदीप सातपूते, दिपक तागड, गौरव जाजू, दिलीप फलके, डाँ.संजय लड्डा, भागनाथ काटे, प्रविण लाहोटी, संदीप एकशिंगे, आशिष तोतला, सागर तरटे, नंदन लाहोटी, किसन माने, मुरलीधर पाटील, बबनराव तागड, रमण बिहाणी, मधूर पलोड, तेजस आदमाने, स्वामी काळे, प्रकाश घनवट, उमेश महाजन व रेसिडेन्सिल हायस्कूलचे विद्यार्थी व संकल्प अॅकेडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.