Breaking News

सायनाची पाचव्या स्थानी झेप

नवी दिल्ली, दि. 01 - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत (रँकिंग) पाचव्या स्थानी झेप घेतली. युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने अव्वल दहामध्ये (टॉप टेन) स्थान राखले आहे.
ताज्या क्रमवारीत महिला एकेरीत सायनाचे रँकिंग एका स्थानाने वधारले. ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या सायनाने जपानच्या नोझोमी ओकुहाराला मागे टाकत पाचवे स्थान मिळवले. सिंधू दहाव्या स्थानी कायम आहे. महिला एकेरीत स्पेनची कॅरोलिना मॅरिन अव्वल स्थानी आहे. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्‍विनी पोनप्पाचे रँकिंग चार स्थानांनी घसरले. ही जोडी 20व्या स्थानी स्थिरावली आहे.
पुरुष एकेरीत ‘टॉप टेन’मध्ये भारताचा एकही बॅडमिंटनपटू नाही. किदांबी श्रीकांत (11 वे), अजय जयराम (24 वे)आणि एच. एस. प्रणॉयचे (28 वे) रँकिंग कायम आहे. पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि बी. सुमीथ रेड्डीचीही दोन स्थानांनी घसरण झाली. ताज्या क्रमवारीत ते 23व्या स्थानी आहेत.