बांधकाम क्षेत्रातील कामगारांची नोंदणी : डॉ. विखे
लोणी प्रतिनिधी
विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या लोणी येथील संपर्क कार्यालयात नावनोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सरकारच्या विविध २८ कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. यात १८ ते ६० वयोगटातील बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. सुजय विखे यांनी दिली.
शहरी आणि ग्रामीण भागात इमारती बांधणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी शासनाने ‘विश्वकर्मा सन्मान योजना’ जाहीर करण्यात आली आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजनेद्वारे शैक्षणिक सहाय्य योजना तसेच आर्थिक सहाय्य, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व अन्य योजनांचा लाभ दिला जाणार आहे. दरम्यान, बांधकाम कामगारांच्या पाल्यांना पहिली ते सातवीपर्यंत ७५ टक्के उपस्थिती असलेल्या आणि प्रतिवर्षी अडीच हजार, आठवी ते दहावी पाच हजार, दहावी-बारावीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविल्यास १० हजारांचे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य केले जाणार आहे. तसेच पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गतही या कामगारांचा समावेश केला जाणार आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व राज्य सरकारच्या विविध २८ योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
या अभियानात दगडफोड कामगार, लादी किंवा फरशीची कामे करणारे कामगार, रंग व सुतारकाम, इलेक्ट्रिशियन व इतर कामे, नाले बांधणी, प्लंबिंग, अग्निशमन यंत्रणेची कामे, वातानुकूलितची कामे, सुरक्षा उपकरणांची कामे, जल संचयन व इतर कामे, काचेची कामे, सौर ऊर्जेशी निगडित कामे, धातूचे दरवाजे व खिडक्यांची कामे करणारे, विटांच्या कौलाची कामे, स्वयंपाक घरातील आधुनिक उपकरणांची कामे यासह विविध बांधकाम संबधी कामे करणाऱ्या कामगारांना नावनोंदणी करता येणार आहे. याविषयी लोणी परिसरात जनजागृती होण्यासाठी आठवडी बाजारच्या दिवशी चित्ररथाव्दारे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या लोणी येथील संपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी केले.