Breaking News

हायड्रोइलेक्ट्रिसिटी प्रकल्पात स्फोट

पूर्व नेपाळमध्ये पाण्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाच्या (हायड्रोइलेक्ट्रिसिटी) कार्यालयात स्फोट झाला. हा प्रकल्प भारताने विकसित केलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते क ाही आठवड्यांनंतर या प्रकल्पाचे उद्घाटन होणार होते. मात्र, तत्पूर्वी ही घटना समोर आली आहे. या स्फोटात कार्यालयाच्या भिंतींचे मोठे नुकसान झाले आहे.

900 मेगावॅट क्षमतेचा अरुण-3 हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प 2020 पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मे रोजी आपल्या नेपाळ दौर्‍यादरम्यान या प्रक ल्पाचे उदघाटन करणार होते. तत्पूर्वीच या प्रकल्प कार्यालयात स्फोट झाला. या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तसेच चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्विकारलेली नाही.