जनजागृतीमुळे समाजाची विकासाकडे वाटचाल : सोनवणे
एकलव्य सेवा संघाच्यावतीने श्रीरामपूर येथे भिल्ल राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे उदघाटन झाले. त्याप्रसंगी माळी बोलत होते. प्रारंभी वधूवर मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नाशिकचे पोलीस उपअधीक्षक साजन सोनवणे, सहाय्यक निबंधक बी. आर. माळी, मच्छिंद्र बर्डे, गमन सोनवणे, बी. एल. माळे, यु. डी. गायकवाड, प्रदीप माळी, संतोष माळी, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नवनाथ अकोलकर, ज्योती बर्डे यांनी केले. प्रारंभी संजय बर्डे यांनी प्रास्तविक केले. राष्ट्रवादी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब माळी, प्रदेशाध्यक्ष मेजर सरदार, उपाध्यक्ष नवनाथ अकोलकर, अध्यक्ष परिवर्तन उत्तमराव दाभाडे, के. एल. पटारे, रविंद्र बर्डे, अमर गायकवाड, गांगुर्डे महाराज, आनंदा साळवे, नरेंद्र लचके, सुदर्शन शितोळे आदींनी उपस्थित होते.
