Breaking News

‘आत्मा मालिक’च्या विदयार्थ्यांचे सुयश

कोपरगाव ता. प्रतिनिधी - येथील सायन्स ऑलिंपियाड फांउडेशन आयोजित एस. ओ. एफ. नॅशनल सायबर, ऑलिंपियाड परीक्षेमध्ये ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुल कोकमठाणच्या १४ विदयार्थ्यानी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. यामध्ये आर्यन देवसरकर, सौरभ सगळे, ओम लोंढे, ऋषिकेश बनकर, अभिषेक वाघ, ऋषिकेश चितळे, अर्जुन वीर, तेजस आढाव, अस्मिता वरकड, शुभम चव्हाण, साहिल दिघे, आबासाहेब चव्हाण, गजानन नवले, रोहन राऊत आदींचा समावेश आहे.

या विदयार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सागर अहिरे, पर्यवेक्षक अनिल सोनवणे, विषय शिक्षक गुरुराज सज्जन यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल आश्रमाचे संत देवानंद महाराज, परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.