Breaking News

रोटरी क्लब ऑफ शेवगावच्या वतीने वृक्षारोपन


शेवगाव  ( शहर प्रतिनीधी )
पर्यावरणाचा दिवसेंदिवस र्‍हास होत असल्याने निसर्गाचे संतुलन बिघडले असून त्याचे गंभीर परिणाम मानवजातीसह प्राणिमात्रांना भोगावे लागत आहे. पर्यावरणाचा समतोल राखून भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे असे मत रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष प्राचार्य दिलीप फलके यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी, उर्जा फाऊंडेशन व रेसिडेन्सिअल विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या वरूर बुद्रुक ( ता. शेवगाव ) गावाकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा एक किलोमीटर अंतरापर्यंत सुमारे 600 विविध झाडांचे वृक्षारोपण 
करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वनविभागाचे क्षेत्रीय अधिकारी संदिप एकशिंगे यांनी वृक्षारोपणासाठी रोपे दिली. रोटरीच्या वतीने लांडेवस्ती रस्ता तसेच पाथर्डी रस्त्यालगतचे दत्तमंदिर या ठिकाणीही वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सुमारे दोन हजार रोपांचे वृक्षारोपण करून वर्षभर वृक्षसंवर्धनाकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे प्राचार्य फलके यांनी सांगीतले. रोटरीचे अध्यक्ष प्राचार्य फलके यांच्या सह भागनाथ काटे, डॉ. संजय लड्डा, डॉ. हरिचंद्र गवळी, प्रविण लाहोटी, प्रा. किसन माने, नितीन भुसारी, उर्जा फाऊंडेशनचे दीपक तागड, संदिप सातपुते, गौरव जाजू, आशिष तोतला, सागर तरटे, नंदन लाहोटी, रमण बिहाणी, किशोर थोरात, विजय शिंदे आदींसह रेसिडेन्सिअल विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला.