श्री हरिहर महाराज यांची 29 वी पुण्यतिथी निमित्ताने कीर्तन
बेलपिंपळगाव प्रतिनिधी - नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे समर्थ सदगुरु योगीराज हरिहर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गावात हरिहर महाराज मंदिरात सुरु असलेल्या सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. उद्या मंगळवार दि. 17 जुलै रोजी सायं. 4 वा काल्याचे कीर्तन वाणीभूषण ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे होणार असून त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.