जैन चार्तूर्मासानिमीत्त स्वागत
पाथर्डी: जैन चार्तूर्मास निमीत्त प.पु. सिध्दीसुधाजी महाराज, पाथर्डी भुषण सुविधीजी महाराज, समितीजी महाराज यांचे शहरात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आ. मोनिका राजळे, श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडीया, सुरेश गुगळे, सतिष गुगळे, चंपालाल गांधी, अदिसह प्रतिभा सुविधी, हितेशी, कन्या मंडळाच्या सदस्या व तालुक्यातील जैन समाज उपस्थित होते.