स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विभागीय प्रवक्तेपदी डॉ.अशोक ढगे यांची नियुक्ती
नेवासाफाटा (प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील खेडले काजळी येथील कृषी तज्ञ डॉ.अशोक ढगे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विभागीय प्रवक्ते म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र स्वतः खासदार शेट्टी यांनी डॉ. अशोकराव ढगे यांना प्रदान केले असल्याची माहिती माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी पत्रकाद्वारे दिली. कृषितज्ञ डॉ. अशोक ढगे यांच्या निवडीचे अनेक संस्थांनी तसेच शेतकर्यांनी अभिनंदन केले आहे