Breaking News

भारतीय फुटबॉल संघ आशियाई खेळांसाठी अपात्र?


मुंबई प्रतिनिधी

पुढील काही दिवसात सुरु होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय फुटबॉल संघाला अद्याप परवानगी दिलेली नाहीये. संघटनेच्या या पवित्र्यामुळेभारतीय फुटबॉल महासंघात संभ्रमाचं वातावरण आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनी ऑलिम्पिक संघटना आणि सरकारने भारतीय संघाला आशियाई खेळांमध्ये सहभाग घेण्याचीपरवानगी दिली होती, अशी माहिती दिली होती. मात्र ऑलिम्पिक संघटनेकडून फुटबॉल महासंघाला लिखीत स्वरुपातली परवानगी मिळाली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.दुरदृष्टीचा अभाव आणि स्पर्धात्मक फुटबॉल खेळण्याचा अभाव असल्याचं कारण देत ऑलिम्पीक संघटनेने परवानगी नाकारली आहे. ऑलिम्पिक संघटनेने घेतलेल्या पवित्र्यावरफुटबॉ़ल महासंघाने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आशियाई खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी असलेल्या निकषांमध्ये, सांघिक खेळांमध्ये भारताचा संघ आशियाईदेशांमध्ये सर्वोत्तम ८ स्थानांवर येणं गरजेचं आहे. सध्या भारताचा संघ आशियाई देशांमध्ये १४ व्या तर महिलांचा संघ १३ व्या स्थानावर आहे. मात्र गरजेनुसार या निकषांमध्येशिथीलता आणली गेली होती.