Breaking News

क्रोएशियाचा डेन्मार्कवर रोमहर्षक विजय


मॉस्को


फिफा विश्वचषकाच्या २०१८ च्या बाद फेरीमध्ये क्रोएशिया आणि डेन्मार्क या दोन संघांमध्ये निझनी नोव्होगोरोड शहरातील मैदानावर लढत झाली. क्रोएशियाने दमदार कामगिरीकरत डेन्मार्कचा ३-२ ने पराभव केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये डेन्मार्कवर मात करत क्रोएशियाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाचा सामना यजमानरशियाशी होणार आहे.

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये रात्री क्रोएशिया विरुद्ध डेन्मार्क यांच्यात सामना पार पडला. क्रोएशियाने साखळीतील तीनही सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश केल्याने संघाचे पारडे जडहोते. तर १९९८ नंतर पुन्हा एकदा बाद फेरीचा अडथळा ओलांडण्यास डेन्मार्कचा संघ उत्सुक होता.

दोन्ही संघांची सुरुवात आक्रमक होती. पहिल्याच मिनिटाला डेन्मार्कने गोल मारुन १- ० अशी आघाडी मिळवली. जोर्गनसनने हा गोल मारला. पण क्रोएशियातर्फे मारियोमेंडझुकिझने चौथ्याच मिनिटाला गोल मारुन संघाला बरोबरी मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघाला गोल मारण्यात अपयश आले. डेन्मार्कला आणखी एक गोल मारण्याची संधीमिळाली खरी पण क्रोएशियाच्या गोलकिपरने हा प्रयत्न हाणून पाडला. निर्धारित पूर्ण वेळेत १- १ अशी बरोबरी कायम होती. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही बरोबरी कायम राहिल्यानेहा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहोचला. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कवर ३- २ विजय मिळवला. क्रोएशियाचा गोलकिपर सुबासिच हा विजयाचा शिल्पकारठरला.