Breaking News

प्रहार संघटनेचे राहूरीत रक्तदान शिबीर


राहुरी / ता. प्रतिनिधी 
प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू यांचे वाढदिवसानिमित्त येत्या गुरुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांग सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त राहुरी तालुका प्रहार अपंग संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर रोटरी बल्ड बँक राहुरी येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत आयोजीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी पो.नि. अविनाश शिळीमकर, तहसीलदार अनिल दौंडे, राहुरी नगरपरिषद मुख्याधिकारी अनुप डूरे व राहुरी नगरपरिषद नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.