'७० वर्षानंतर' या शेतक-यांच्या आत्महत्यावर आधारीत चित्रपटाचे अनावरण
।संगमनेर/प्रतिनिधी।
'७० वर्षानंतर' या लार्ज शॉर्ट फिल्म प्रकारातील शेतक-यांच्या आत्महत्यावर चित्रपटाचा प्रिमियर शो नुकताच पार पडला. येथील संगमनेर महाविद्यायलाच्या साईबाबा सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, आ. डॉ. सुधीर तांबे, सत्यशोधक चळवळीचे किशोर ढमाले, चित्रपट समीक्षक अनिल म्हमाणे, लेखिका करुणा मीनचेकट, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख आदी उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना शेतक-यांची होणारी परवड, मुलभूत प्रश्न, सततचा दुष्काळ, भांडवलदारधार्जिणे धोरणे, शेतकरीविरोधी कायदे आणि विविध पातळ्यावरील शेतक-यांचे शोषण या विरोधात संघर्ष करण्याचे आवाहन केले. लघुपटाचे समीक्षक अनिल म्हमाणे लघुपटात दाखविल्या जाणा-या शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नांवर शेतमालाचा बाजारभाव, शेतक-यांचे कर्ज, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न या समस्यावरील सरकारचे आणि त्याचे मत व्यक्त केले. शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाय, पॅकेजेस मंजूर होतात. तरीही ही व्यवस्थाच बदलत नाही, तोवर वरवरचे उपाय फोल ठरत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप वाकचौरे आणि प्रा. सूशांत सातपुते यांनी केले. अंतुन घोडके यांनी आभार मानले.