अखेर शिवसेना खा. रवींद्र गायकवाड संसदेत दाखल
नवी दिल्ली, दि. 06 - शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड अखेर संसद परिसरात पोहोचले आहेत. आज सकाळी खासदार गायकवाड यांनी संसद परिसरात दिसले. संसदेतील शिवसेना पक्ष कार्यालयात खासदारांची बैठक झाली. सध्या ते शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरी आहेत. दरम्यान ‘शिवसैनिक कभी भागते नही’ अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. कोणी धक्काबुक्की केली, असा सवालही त्यांनी विचारला.
दुसरीकडे सरकार लक्ष देत नसेल, तर आम्ही सरकारमध्ये राहून गप्प बसू का, असं खासदार आनंदराव अडसूळ यांनी नमूद केलं. लोकसभेत गायकवाडांच्या प्रकरणावर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ 11 वाजता स्थगन प्रस्ताव ठेवणार आहेत. हा स्थगन प्रस्ताव लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन अमान्य करण्याचीच शक्यता आहे. मग त्यावेळी त्यांना झिरो अवरमधे बोलू देण्याची संधी मिळावी अशी विनंती करण्यात येईल.