Breaking News

सर्वांच्या सहकार्यामुळे लोणी बुद्रूकचा विकास : विखे


लोणी प्रतिनिधी 

लोणी बुद्रूक गावाला देशात वेगळी ओळख आहे. सर्व सामाजाला बरोबर घेऊन सर्वांगीण विकास साधण्याची या गावाला परंपरा आहे. सर्वांचे सहकार्य मिळत असल्यानेच सातत्यपूर्ण या गावचा विकास होत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.

कृषिदिनानिमित्त गावातील नवविवाहित सुना, लेकींना व गुणवंत विद्यार्थ्‍यांना वृक्ष भेट देऊन लोणीकरांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने कृषिदिन साजरा केला. लोणी बुद्रुक गावाचे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्‍या मंदिर प्रांगणात अध्यक्षा विखे आणि माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या हस्ते कृषिदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. मंदिराच्या सभामंडपात यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी कृषिदिनाची माहिती देत वृक्षारोपणाचे महत्व विशद केले. यावेळी ग्रामपंचयतीच्यावतीने गावातील नवविवाहित जोडप्यांना छोटेसे रोपटे भेट देण्यात आले. सुना आणि लेकी अशा दोघींना शुभेच्छा म्हणून रोपटे भेट दिले. लेकींना ‘माहेरची झाडी’ असे नाव या कार्यक्रमाला देण्यात आले होते. गावातील ज्येष्ठांना त्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून रोपटे देण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणाईला यावेळी सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्वच पाहुण्यांना वृक्षभेट देण्यात आले.

दरम्यान, अध्यक्षा विखे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या योजनेतून निधी उपलब्ध दिला. हे करीत असतांना लोणी-श्रीरामपूर या मुख्य रस्त्यावर त्यांनी ४० लाख रुपये खर्च करून पथदिवे बसविले. त्यामुळे या गावातून जाणारा हा मुख्य रस्ता सुंदररित्‍या प्रकाशमय झाला. त्याबद्दल ग्रामस्‍थांनी त्यांना धन्यवाद दिले.

यावेळी ज्येष्‍ठ नेते काशिनाथ विखे, जि. प. चे माजी सदस्य सोपान मैड, प्रवरा बँकेचे माजी संचालक किसनराव विखे, माजी उपसभापती सुभाष विखे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, एम. वाय. विखे, भगवंतराव विखे, डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक विक्रांत विखे, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदु राठी, पं. स. सदस्य काळू रजपूत, संतोष ब्राम्हणे, प्रवरा सेवक पतसंस्थेचे अध्यक्ष नवनाथ विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, लोणी खुर्दच्‍या सरपंच मनीषा आहेर, ग्रामविकास अधिकारी कविता आहेर, विकास संस्थेचे अध्यक्ष चांगदेव विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, अशोक धावणे, संजय धावणे, माजी उपसरपंच अण्णासाहेब म्हस्के, वसंतराव विखे, अॅड. सुरेश लगड, सदस्य गणेश विखे, राहुल धावणे, शंकर विखे, बंडू विखे, भाऊसाहेब विखे, लक्ष्मण विखे, सचिन विखे, नवनीत साबळे, सुधाकर विखे, अनिल विखे, संतोष विखे आदिंसह ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.