Breaking News

अहमनगर दक्षिण जिल्ह्यातील रासपचा कार्यकर्ता मेळावा


कर्जत / प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्यात रासपाची दखल घ्यावी अशी ताकद आहे. त्यामुळेच भाजपाला जानकर यांना ताकद द्यावी लागली. आगामी काळात जिल्ह्यात दोन आ. निवडून आणायचे आहेत असे प्रतिपादन रासपाचे महासचिव बाळासाहेब दौलतडे यांनी केले.
रासपाच्या दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा कर्जत येथील श्रध्दा हॅप्पी वर्ल्डच्या सभागृहात संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महासचिव बाळासाहेब दौलतडे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रविंद्र कोठारी यांनी करताना पक्षाच्या मेळाव्यास सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. कारण पक्षाची ताकद आगामी 2019 च्या निवडणुकीत कळणार आहे. कारण पक्षाची स्थापना होवून पंधरा वर्षे झाली असून आगामी वर्ष सोळावं धोक्याचे असले तरी, ते पक्षापेक्षा इतरांना धोकादायक ठरणार आहे असे म्हटले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य नितीन धायगुडे, पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिक दांगडे, प्रदेशउपाध्यक्ष दादासाहेब केसकर, आण्णासाहेब रुपनर, आप्पासाहेब पालवे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना बाळासाहेब दौलतडे यांनी पक्ष खूप वाढतोय असे सांगताना, पदाधिकार्‍याची मानसिकता तपासण्याचे सांगताना आगामी काळात मिशन 50 साठी प्रयत्न करा, यासाठी गाव तेथे शाखा मिशन राबवा असेही ते म्हणाले. 
प्रदेश सरचिटणीस गजानन चौघुले, युवक तालुकाध्यक्ष महेंद्र कोपनर, महिला तालुकाध्यक्ष मनीषा जगताप, संतोष गोलांडे, दादासाहेब वाघमोडे, पोपट गुलदगड, काशिनाथ देवकाते, हनुमंत पारखे, बापूसाहेब व्हरकटे, रवी खामगळ, महादेव चांडे, कृष्णा गिरे, किशोर रासकर, दादा कोळेकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश व्हरकटे यांनी केले. या कार्यक्रमातच महासचिव दौलतडे यांनी रवींद्र कोठारी यांची अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी त्याचा सत्कार करण्यात आला. विविध ठरावात भाजपने महादेव जानकर यांना विधान परिषदेची जागा सोडल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी सत्कारासाठी शाल, नारळ, हार, वापरण्या ऐवजी रोपे वापरून शासनाच्या कार्यक्रमात सहभाग ही नोंदवला.