Breaking News

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत


खर्डा / प्रतिनिधी 
सालाबादप्रमाणे या वर्षी खर्डा नगरीत, संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. या वर्षी जय भवानी तरूण मंडळ बंगलागल्ली यांनी एक समाजसेवा म्हणून गणेश मंदिर या ठिकाणी सोनगिरी महाराज यांच्या दिंडीचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. तरुण मंडळ कार्यकर्त्याने मोठ्या संख्येने सहभागी राहून अन्नदानाचे व श्रमदानाचे कार्य केले. सर्व वारकरी यांना मंडळाच्या वतीने भोजन देण्यात आले. तसेच रात्री 9 ते 11 या वेळेत ह.भ. प. जाधव महाराज लोहगावकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. दुसर्‍या दिवशी सकाळी चहा व नाष्टा यांची सोय करण्यात आली. या वेळी येथील नागरिकांनी मोठे सहकार्य केले. कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. दिंडीतील नागरिकांंनी झालेल्या सोयीबद्दल समाधान व्यक्त केले.