Breaking News

जिल्हा मुख्यालयाची पत्रकार मंचची एकमुखी मागणी


संगमनेर : संगमनेर जिल्हा व्हावा, या मागणीसाठी कृती समितीद्वारे शहरात सुरु असलेल्या आंदोलनाला संगमनेर पत्रकार मंचने पाठिंबा दर्शविला. शहरातील विविध वृत्तपत्र आणि वाहिन्यांच्या प्रतिनिधींचा यामध्ये समावेश आहे. या पत्रकारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंब्याचे पत्र कृती समितीचे सक्रीय सदस्य अमोल खताळ यांच्याकडे सुपूर्द केले. 
यावेळी संगमनेर पत्रकार मंचचे सर्व सदस्य कृती समितीसोबत असल्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भौगोलिकदृष्टीने मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संगमनेर जिल्हा मागणी कृती समितीने आंदोलनाची गती तीव्र करीत संगमनेर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर सह्यांच्या मोहिमेला सुरुवात केली. गेल्या दिड महिन्यापासून सुरु असलेल्या या मोहिमेला संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून याच ठिकाणी कृती समिती सदस्यांनी गेल्या दहा दिवसांपासून साखळी उपोषणाचे आंदोलनही सुरु केले आहे.

यासंदर्भात कृती समितीला देण्यात आलेल्या निवेदनावर पत्रकार मंचचे अध्यक्ष सुनील नवले, सचिव श्याम तिवारी, अध्यक्ष राजा वराट, शेखर पानसरे, नितीन ओझा, गोरक्ष नेहे, गोरक्षनाथ मदने, राजु नरवडे, संजय अहिरे, अंकुश बूब, बाबासाहेब कडू, काशिनाथ गोसावी आदींच्या सह्या आहेत.