Breaking News

स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत आयोजित ’स्वच्छता स्पर्धा’ संपन्न

ठाणे, दि. 01, फेब्रुवारी - शहरात सुरु असलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण 2018’’ अंर्तगत ठाणे महापालिकेने प्रत्येक प्रभाग समिती मध्ये विविध गटात ‘स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्वच्छता स्पर्धेचा प्रमाणपत्र वितरण समारंभ प्रत्येक प्रभाग समितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

महापालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक प्रभाग समिती मध्ये या स्वच्छता स्पर्धा पार पडल्या.या मध्ये स्वच्छ हॉटेल, स्वच्छ सोसायटी, स्वच्छ शाळा, स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ मोहल्ला आदी विभागात या स्पर्धा घेण्यात आली आहेत. या विविध गटात स्वयंमूल्यनिर्धारण अर्जवाटप करण्यात आले होते .त्यानुसार प्रत्येक गटाने केलेल्या स्वच्छतेचे परीक्षण करण्यात आले असून त्यांनी स्वच्छते संदर्भात केलेले उपक्रम कचर्‍याचे वर्गीकरण, शौचालयांचा वापर ,सांडपाण्याचे व्यवस्थापन, जैविक खताची निर्मिती, कचराकुंडीचा वापर आदी गोष्टीचे परीक्षण या स्पर्धेमध्ये करण्यात आले.