सालवडगावमध्ये स्वच्छता रॅलीचे आयोजन
शेवगांव / श. प्रतिनिधी
सालवडगांव येथे आज स्वछता रॅलीचे सफल आयोजन करण्यात आले. ही रॅली जून 2018 पासून येथे सुरु असलेल्या ’समर इंटरशिप प्रोग्राम’ 2018 च्या अंतर्गत आणि प्राथमिक शाळा सालवडगाव यांच्या मदतीने आयोजित करण्यात आली होती. ’स्वच्छ भारत, सुंदर भारत, सगळे एकत्र येऊया, गाव स्वच्छ करुया’ अशा घोषणा देत या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश दिला. रॅलीत न्यू आर्टस् कॉलेज शेवगावच्या विद्यार्थ्यांसोबत सहभागी झालेले प्राथमिक शाळेचे विद्यार्थी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नियोजन, बोर्ड, स्वच्छता पाट्या आणि विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेविषयींच्या घोषणांना ग्रामस्थांनीही उत्तम प्रतिसाद दिला. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी रामनाथ रुईकर, राहुल नरवडे, प्रा. दादासाहेब लोखंडे, प्रा. संदीप मिरे, प्रा. किशोर कांबळे आणि डॉ. गोकुळ क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले.