Breaking News

आठव्या आयआरएनएसएच-1 एच’ उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी

श्रीहरिकोटा, दि. 01, सप्टेंबर - आठव्या आयआरएनएसएच-1एच (IRNSS-1H) या उपग्रहाचे प्रक्षेपण आज अयशस्वी झाल्याची माहिती भारतीय अंतराळ  संशोधन संस्थे (इस्त्रो) चे प्रमुख एच.एस. किरण कुमार यांनी दिली.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. मात्र अल्पावाधीतच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने हे प्रक्षेपण अयशस्वी झाले.  या तांत्रिक बिघाडीची चौकशी केली जाईल, असेही किरण कुमार यांनी सांगितले.
या उपग्रहाचे वजन 1 हजार 425 किलोग्रॅम असून पीएसएलव्ही श्रेणीच्या एक्सेल बनावटीच्या अग्नीबाणाच्या (रॉकेट) माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले. या  उपग्रहामुळे जीपीएस क्षमतेत वाढ होणार होती. बंगळूरूच्या अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजी द्वारे नाविक साखळीतील हा एक उपग्रह आहे. 70 वैज्ञानिकांनी मोठ्या  मेहनतीने हा उपग्रह तयार केला होता. या साठी प्रथमच खाजगी कंपन्यांची मदत घेण्यात आली होती, असेही किरण कुमार यांनी सांगितले.