Breaking News

डोंगरगांव येथे ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

लासलगाव, दि. 22, जानेवारी - निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे मोठे बाबा यात्रेत तोंडाने वाजवान्याचा भोंगा दिला नाही या कारणामुळे दोन गटात हाणामारी झाली यासंदर्भात लासलगाव पोलीस कार्यालयात 15 इसमांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे लासलगाव व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



या बाबत लासलगाव पोलीस कार्यालयात कळवणचे पोलिस उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे सालाबाद प्रमाणे रविवारी मोठा बाबाची यात्रा आयोजित करण्यात आली होती.या यात्रेत फिर्यादी ज्ञानेश्‍वर मुरलीधर नेटारे रा. डोंगरगांव यांचा भाचा शंकर काळू भालेराव राहणार पिंपळगाव बसवंत हा राहाट पाळण्यात बसलेला असताना यात्रेतील गोरख का शिनाथ नागरे, योगेश वाळीबा नागरे, समाधान वाळीबा नागरे, बापू नंदु नागरे, राहुल नंदू नागरे, त्र्यंबक सुरेश सांगळे,सचिन काशिनाथ सानप, शुभम दुलाजी सानप,सुनील विश्‍वनाथ आव्हाड,निखिल विजय कुटे, अनिल बंडू सानप,विश्‍वास बालू नागरे,सुनील बच्चाव राख,राहुल मधुकर आव्हाड,संदीप काशीनाथ नागरे सर्व राहणार डोंगरगांव यांनी तोंडाने वाजविण्याचा भोंगा मागितला असता तो न देता तो पळून गेला त्याचा पाठलाग करून त्याला पकडून या सर्व 15 इस्माणी त्याला जातीवाचक शिवीगाळ करून गळा दाबून मारहाण केली.