आरोग्यसेवेत आनंदऋषीजी हॉस्पिटल उत्तम : सांगळे
गरजू घटकातील रुग्णांच्या आरोग्यसेवेत आनंदऋषीजी हॉस्पिटलचा मोलाचा वाटा आहे. अॅलोपॅथीसह आयुर्वेदिक व होमिओपॅथीची सेवा देवून सर्वसंपन्न असलेले हे रुग्णालय गरजू रुग्णांचा आधार बनला आहे. अद्यावत सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरच्या माध्यमातून राज्यासह देशात या रुग्णालयाचा नांवलौकिक वाढला असल्याची भावना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या वतीने आचार्य आनंदऋषी म. सा. यांच्या 26 व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त सुशीलाबाई लखमीचंद बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवाराच्या वतीने आयोजित होमिओपॅथी शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. सांगळे बोलत होते. यावेळी होमिओपॅथी तज्ञ डॉ. शैलेश संचेती, परेश बोथरा, संतोष बोथरा, अजित बोथरा, सतिष बोथरा, अपर्णा बोथरा, प्रतिभा बोथरा, कोमल बोथरा आदी उपस्थित होते.