सर्वधर्म समानता ही संताची शिकवण : डॉ. सय्यद
पारनेर / प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यावर्षी शहरातील हभप सोपान औटी यांनी आषाढी एकादशी निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपुर या ठिकाणी पायी वारी दिंडीची परंपरा गेल्या 25 वर्षापासुन सुरु केली आहे. त्याप्रमाणे ही दिंडी श्रीगोंदा येथील महमंद महाराज यांच्या मठात थांबत असते. त्याठिकाणी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या पायी दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त अध्यात्म किंवा धार्मिक भावना जपणे हे नसुन, जाती पातीचा भेदभाव दुर करण्याचे काम सुरू असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. रफिक सय्यद यांनी व्यक्त केले. श्रीगोंदा येथील महमंद महाराज यांच्या मठात या पायीदिंडीची राहण्याची व व्यवस्था करुन जातीभेदाचा नवा आदर्श अध्याय सुरु केला आहे.
यावेळी डॉ. रफिक सय्यद प्रवचनात म्हटले की, संत तुकाराम महाराज व श्रीगोंद्याचे महमंद महाराज यांचे जवळचे संबंध होते. यामुळे तेंव्हापासुन या मठात दिंडीवाले थांबतात. येथे किर्तनाचेही आयोजन करण्यात येते. मालोजी राजे यांनी महमंद महाराज यांना गुरु मानुन महाराजांच्या मठासाठी जागा उपलब्द करुन दिली होती. त्यामुळे जातीभेद दूर करण्याची संताची शिकवण असल्याचे डॉ. रफिक सय्यद यांनी सांगितले. त्यामुळे सर्वधर्म समानता मानवता ही संतांची असुन समाजाला खरी गरज असल्याचे मत डॉ. सय्यद यांनी व्यक्त केली.