Breaking News

राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामी गुरूपौर्णिमा उत्सवाची तयारी सुरू


कोपरगाव / श. प्रतिनिधी 
सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगाव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधीस्थानी गुरूपौर्णिमा उत्सव 27 जुलै रोजी पहाटे साडेचार ते दु. 1 या वेळेत आयोजित करण्यात आला असून, त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत असल्याची माहिती, श्री संत सदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान व श्री काशिविश्‍वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे अध्यक्ष मोहन चव्हाण यांनी दिली.
गुरूपौर्णिमा उत्सवासाठी प. पू. मधुगिरी, माधवगिरी, रमेशगिरी, दत्तगिरी, ज्ञानगिरी, भोलेगिरी, श्री श्री 1008 महामंडलेश्‍वर शिवानंदगिरी, संतोषगिरी, परशरामगिरी, श्रवणगिरी, केशवगिरी, सुदामगिरी, गुलाबगिरी, संदिपगिरी, सोमेश्‍वरगिरी, गणेशगिरी, भास्करानंदगिरी, शीवभक्त भाऊ पाटील आदी संत महंत उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. या गुरूपौर्णिमा उत्सव सोहळयानिमित्त नाशिकचे कानडे बंधु यांचा सदाबहार भजनाचा कार्यक्रम होणार आहे, तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे. नगर-मनमाड महामार्गावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम असुन, देश विदेशातील भक्त येथे भेट देवुन दर्शन घेतात. पंचधातुपासून जनार्दन स्वामींची सर्वांग सुंदर मुर्ती तयार करण्यांत आली आहे. या सोहळ्याची तयारी सुरू झाली असून, मंदिर कळसावर विद्युत रोषणाईचे काम चालु आहे. संपुर्ण महाराष्ट्र राज्यातुन गुरूपौर्णिमा उत्सवासाठी लाखो भाविकांची येथे गर्दी होते. आमटी भाकरीचा महाप्रसाद वाटण्यात येतो.