Breaking News

वक्तृत्व स्पर्धेमध्ये समीक्षा पंडित प्रथम


उक्कलगाव / प्रतिनिधी 
श्रीरामपूर तालुका विज्ञान मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पंचायत समिती व श्रीरामपूर विज्ञान, गणित शिक्षक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने डी. डी. काचोळे विद्यालय श्रीरामपूर येथे नुकताच पार पडला. संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांचे सूचनेप्रमाणे, मार्गदर्शक तत्वानुसार व श्रीरामपूर गटशिक्षणाधिकारी पं. स. सुनील सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेतुन वक्तृत्व स्पर्धा औद्योगिक क्रांती 4.0 आपण तयार आहोत का? या विषयावर इ 8 वी ते 10 वी विद्यार्थ्यांची घेण्यात आली. विविध शाळेंतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशासनाधिकारी नगरपालिका श्रीरामपूर ज्ञानेश्‍वर पटारे, ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी संजीवन दिवे तर मुख्याध्यापक संपत देसाई यांचे अध्यक्षतेखाली उद्घाटन संपन्न झाले. या मेळाव्याचे प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत, स्पर्धा नियोजन विज्ञान शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. अनिल लोखंडे यांनी तर स्पर्धेचे नियम शशीकांत थोरात यांनी समजावून सांगितले. 
यामधून प्रथम क्रमांक - समीक्षा शिवाजी पंडीत, भि. रा. खटोड, द्वितीय क्रमांक - प्रतिभा विश्‍वनाथ कडनर, प्रवरा माध्य. विद्यालय गळनिंब या विद्यार्थिनींनी पटकावला, त्यांची जिल्हा स्तरावर होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली. सदर मेळावा यशस्वीतेसाठी साहेबराव रकटे, विजय नान्नर, सूर्यकांत डावखर, शशीकांत थोरात, किरण पुंड, कैलास जेजुरकर, संतोष सोनवणे, नवनाथ साळवे, साधना शेळके, दिपक चव्हाण, इरफान शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. यशस्वी स्पर्धकांचे तसेच मेळावा यशस्वी झाल्याबद्दल संयोजकांचे सर्व उपस्थित विज्ञान शिक्षक व मान्यवरांनी अभिनंदन केले.