Breaking News

लोणी हवेली येथे वन विभागामार्फत गॅसचे वितरण


सुपा / प्रतिनिधी 
पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथे शनिवारी वन विभागामार्फत गॅस वितरण करण्यात आले. गावातील ज्या कुटुंबाला गॅस नाही, त्यांना सरपनासाठी जंगलामध्ये वनवन फिरावे लागु नये. जंगलातील वृक्ष तोडीपासून संरक्षण व्हावे यासाठी, वन विभागाने ज्यांना गॅस नाही त्यांच्यासाठी ही योजना निर्माण केली आहे. या योजनेचा लाभ लोणी हवेलीतील बर्‍याच लाभार्थांना झाला. त्यामध्ये विलास कोल्हे, सारिका कोल्हे, राजु कोल्हे, गंगाधर दुधाडे, विजया कोल्हे, हिराबाई कोल्हे, मनोज कोल्हे, गणपत सोंडकर, चंद्रकांत कोल्हे, शांताबाई कोल्हे, विमल टकले, राहुल शिंदे, मारूती कोल्हे आदींना गॅस वितरण करण्यात आले. 
यावेळी लोणी हवेलीचे सरपंच मनिषा कोल्हे, उपसरपंच संजय कोल्हे, माजी सरपंच डॉ. शंकर कोल्हे, सुभाष दुधाडे, ग्रा. सदस्या सोनाली दुधाडे, वन विभागाचे अधिकारी जाधव, युवराज जगताप, बाळू दुधाडे, सचिन दुधाडे, सागर हिंगडे, निलेश वाखारे, मनोज कोल्हे, रामा कोल्हे, ज्ञानदेव कोल्हे, शरद जगताप, गजानन सोडकर, सुभाष शिंदे, निलेश कोल्हे, प्रमोद कोल्हे, अनिल दुधाडे, विजय दुधाडे, सचिन कोल्हे आदी उपस्थित होते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांच्या कुपणावर गॅसधारकाचा शिक्का नाही, अशा गरजुंना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी बँकेचे पासबुक, आधार कार्ड, कुपण झेरॉक्स आदी कागदपत्राची पुर्तता करणे गरजेचे आहे. हे कागदपत्र ग्रामपंचायतमध्ये जमा झाल्यानंतर ग्रामपंचात हा प्रस्ताव वन विभागाकडे पाठविल व सदर व्यक्तीला लाभ होनार आहे.